नांदेड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड-मेडचल रेल्वेच्या एका बोगीत कचऱ्याच्या ढिगाला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे. प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाने दुपारपर्यंत कोणताही या संदर्भात खुलासा केलेला नाही विशेष म्हणजे रेल्वेचे कोणतेही नुकसान झालेले नाही.
भारतीय रेल्वे ही प्रवाशांसाठी वरदान, सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासासाठी रेल्वे ओळखली जाते. मात्र गेल्या काही वर्षात रेल्वेचे वाढलेले अपघात, आगीच्या घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत. आज सकाळी नांदेड- मेडचल (तेलंगणा) रेल्वे गाडीतही आगीची धक्कादायक घटना घडली. सोमवारी सकाळी नांदेड ते मेडचल रेल्वे गाडीला आग लागली शौचालय जवळ असलेल्या कचऱ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वेळीच आग लागल्याचं लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. आग विझवल्यानंतर गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली आहे. यामध्ये प्रवाशांच्या जीवाला कोणताही धोका झाला नसल्याची माहिती समोर येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis