छत्रपती संभाजीनगर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या हंबरडा मोर्चाच्या निमित्ताने गंगापूर तालुक्यातील शिवराई ग्रामपंचायत येथे ग्रामसभा बैठक घेण्यात आली. शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे यावेळी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी रुपये 50 हजार इतकी थेट आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी.नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज तात्काळ माफ करून त्यांना कर्जमुक्त करावे. पीक विम्याचे कठीण निकष तातडीने शिथिल करून पंचनाम्याची प्रक्रिया बाजूला ठेवत विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना, जुने निकष न लावता, योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरित देण्यात यावा, या मागण्यासाठी संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शिवराई ग्रामपंचायत येथे ग्रामसभा बैठक घेत ठराव प्रारित करण्यात आला.
ठाकरेंच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मराठवाडाव्यापी हंबरडा मोर्चा निमित्त ग्रामसभेत सरपंच व गावकऱ्यांच्या वतीने हा ठराव प्रारित करण्यात आला. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, सरपंच नितीन भुजंग, उपसरपंच तुषार कुंजर,मनोज पिंपळे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis