पुणे, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या पलायनाने राजकारण चांगलेच तापले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मदतीनेच घायवळ परदेशात पळाला असल्याचा आरोप शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी आरोप केला असतानाच आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही याचा पुनरुच्चार केला आहे. याबाबत सरकारने चौकशी करावी अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. निलेश घायवळला कोणी मदत केली याची चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतीच केली होती. घायवळला क्लिअरन्स सर्टिफिकेट कोणी दिलं याचीही पडताळणी करावी असं त्यांनी म्हटलं होते. यानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर घायवळ याला मदत केल्याचा आरोप केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु