'जुन्नरला चार गाई व दोन टन गोमांस जप्त
पुणे, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।जुन्नर शहरातील माईमोहल्ला येथे जुन्नर पोलीसांनी केलेल्या कारवाईत कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या दोन गायी व दोन कालवडी तसेच सुमारे दोन टन गोमांस असा एकूण ३ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अंमलदार श्रीराम शिंदे यांनी
'जुन्नरला चार गाई व दोन टन गोमांस जप्त


पुणे, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।जुन्नर शहरातील माईमोहल्ला येथे जुन्नर पोलीसांनी केलेल्या कारवाईत कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या दोन गायी व दोन कालवडी तसेच सुमारे दोन टन गोमांस असा एकूण ३ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अंमलदार श्रीराम शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार ते पाच अनोळखी व्यक्तींच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण (अधिनियम) १९९५ चे कलम ५ (अ) (ब) (क) ९ व ११ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२५,३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक किरण अवचर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, उपनिरीक्षक तिटमे, पोलीस अंमलदार केंद्रे,लेंभे,ताडगे, सुसलादे,वणवे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.माईमोहल्ला येथील जैन मंदिरा शेजारी असणाऱ्या पत्र्याचे शेडमध्ये गायांचे कापलेले मांस मिळुन आले तसेच दुसऱ्या पत्र्याचे शेडमध्ये चार गायी बांधलेल्या मिळून आल्या. सदरचे पत्र्याचे शेड कोणाचे आहे याबाबत कोणीही माहीती दिली नाही.पोलिसांची चाहूल लागताच चार ते पाच जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande