अमरावती : हॉटेल मालकाकडून ग्राहकावर चाकूने हल्ला
अमरावती, 6 ऑक्टोबर (हिं.स.) रिंगरोडवरील हॉटेल हंडी हन्टमध्ये एका ग्राहकाच्या पोटात थेट चाकू भोसकून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेल मालक रोहित सेंडे याच्यासह दोन अनोळखी महिलांविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आ
अमरावती : हॉटेल मालकाकडून ग्राहकावर चाकूने हल्ला


अमरावती, 6 ऑक्टोबर (हिं.स.)

रिंगरोडवरील हॉटेल हंडी हन्टमध्ये एका ग्राहकाच्या पोटात थेट चाकू भोसकून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेल मालक रोहित सेंडे याच्यासह दोन अनोळखी महिलांविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ओम हरिचंद्र कोठे व त्याचे मित्र नवरात्रोत्सवानंतर कास्तकार हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. दरम्यान, जवळच असलेल्या हंडी हन्ट हॉटेलमध्ये ओमचा मित्र सनी गायकवाड याचा हॉटेल मालकाशी वाद सुरु असल्याचे त्यांनी पाहिले. ओम व त्याचे मित्र वाद मिटवण्यासाठी गेले असता, मालक रोहित सेंडे याने हॉटेलमधून दोन महिला बोलावल्या. त्या महिलांनी ओमचे हात पकडले आणि त्याच क्षणी रोहितने ओमच्या पोटात चाकू भोसकला.घटनेनंतर ओम गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळला. त्याच्या मित्रांनी तात्काळ त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आणि गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रोहित सेंडे व दोन अनोळखी महिलांविरुद्ध भादंवि कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande