परभणी, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। तालुक्यातील भोगाव परिसरातून सागवानाच्या झाडाची बेकायदा कत्तल करीत अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका टेम्पो वन विभागाच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतला.
वन विभागाचे कर्मचारी भोगाव क्षैञात गस्त घालीत असताना भोगाव पासून काही अंतरावर असलेले पोखर्णी शिवारातून अवैधरित्या लाकडाची वाहतूक करताना एम. एच.28 एच 8119 या क्रमांकाचा टेम्पो आढळला.त्यात सागवान पळस हिवर या प्रजातीचे लाकूड आढळून आले. टेम्पो चालकांने उडावाउडवीची उत्तरे दिली, तेव्हा या पथकाचा संशय अधिक दृढ झाला.पथकाने तातडीने हालचाली करीत सर्व बाबी तपासल्या व त्या वाहनावर रीतसर कारवाई करण्यात आली.
कारवाई विभागीय वन अधिकारी डॉ.राजेंद्र नाळे ,सहाय्यक वनसंरक्षक परभणी ढगे ,वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा. जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी तसेच आदी वनरक्षक यांनी कारवाई केली. वाहन टेम्पो मुद्देमाला सहित पकडून सहाय्यक वनरक्षक परभणीत आणून जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास वन परिमंडळ अधिकारी भोगाव के एम थोरे हे करीत आहेत. ही कारवाई केल्यामुळे अवैध वृक्ष तोडून लाकडे वाहतूक करणाऱ्यांचे धाबेदणाणले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis