अमरावती : अंडासेलमधील दोन कैद्यांकडून ३ मोबाईल जप्त; फ्रेजरपूर पोलिसांकडे गुन्हा नोंद
अमरावती, 7 ऑक्टोबर (हिं.स.) | मध्यवर्ती कारागृहातील विशेष झडतीमध्ये अंडासेलमधील दोन कैद्यांजवळ तीन मोबाईल सापडले आहेत. या प्रकारामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोन्ही कैद्यांविरुध्द फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हे द
मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षेवर प्रश्न  अंडासेलमधील दोन कैद्यांजवळ सापडले तीन मोबाईल  फ्रेजरपुरा पोलिसात गुन्हा दाखल


अमरावती, 7 ऑक्टोबर (हिं.स.) | मध्यवर्ती कारागृहातील विशेष झडतीमध्ये अंडासेलमधील दोन कैद्यांजवळ तीन

मोबाईल सापडले आहेत. या प्रकारामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोन्ही कैद्यांविरुध्द फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

6ऑक्टोबरला रात्री ८-१२ वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. मध्यवर्ती कारागृहाच्या गेटवर झडती अंमलदार म्हणून ड्युटीवर असलेल्या अनिष गजानन हरणे (३७) यांनी अंडासेलमधील दोन कैदी तरबेज दरवेश खान, दस्तगीर गफुर शहा (दोन्ही रा अम.)यांचीझडती घेतली. तुरुंग अधिकारी देवराव रोडा जाधव यांच्या आदेशाने १२ अंमलदार यांना सोबत घेऊन ही झडती घेण्यात आली. यावेळी त्यांच्या ताब्यातून लावा कंपनीचा कीपॅड असलेला मोबाईल, अॅपल कंपनीचा ॲन्ड्रॉइड मोबाईल, व नोकिया कंपनीचा किपॅड फोन तसेच दोन नग मोबाईल बॅटरी असे साहित्य सापडले. त्यांच्याकडून हे मोबाईल जप्त करण्यात आले. कारागृह नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे दोन्ही कैद्यांविरुध्द अनिष हरणे यांनी फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनला तक्रार दिली. यानुसार त्यांच्याविरुध्द कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande