मुंबई, 08 ऑक्टोबर (हिं.स.) : ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्मर 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आज, बुधवारी मुंबईत दाखल झाले. या दौऱ्यात भारत आणि ब्रिटन यांच्यातील व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
ब्रिटिश पंतप्रधानांसोबत 100 हून अधिक व्यापारी नेते, विद्यापीठांचे कुलगुरू आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींचा मोठा प्रतिनिधीमंडळ भारतात आला आहे. या शिखर बैठकीदरम्यान विजय माल्या आणि नीरव मोदी यांसारख्या फरार आर्थिक गुन्हेगारांच्या संभाव्य प्रत्यार्पणावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून होत आहे. दोन्ही नेते भारत-ब्रिटन यांच्यातील 'विजन 2035' अंतर्गत 10 वर्षांच्या रोडमॅपचा आढावा घेणार आहेत. या अंतर्गत भारत-ब्रिटन व्यापक आर्थिक आणि व्यापार करार (सीईएटी) पुढे नेण्याचा उद्देश आहे. ब्रिटनच्या संसदेकडून मान्यता मिळाल्यानंतर या करारानुसार 90 टक्क्यांपेक्षा अधिक वस्तूंवरील आयात कर रद्द केला जाणार आहे.
स्टार्मर यांचा आत्मविश्वास आणि भारताबद्दलचे दृष्टिकोन
भारत आगमनानंतर स्टार्मर म्हणाले, “आपण जुलैमध्ये भारतासोबत एक ऐतिहासिक व्यापार करार केला, जो कोणत्याही देशाशी झालेल्या करारांपेक्षा अधिक सुरक्षित आहे. मात्र, ही केवळ सुरुवात आहे.” त्यांनी पुढे म्हटले की भारत 2028 पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, आणि भारतासोबतचा व्यापार ब्रिटनसाठी वेगवान आणि स्वस्त होईल. मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले, “या आठवड्यात आम्ही आमच्या देशातील 125 मोठ्या कंपन्यांसह भारतात ब्रिटिश व्यापाराची ताकद दाखवणार आहोत. भारतात वाढ म्हणजे ब्रिटनमधील नागरिकांसाठी अधिक रोजगार, संधी आणि सुविधा.”
टेक्नॉलॉजी, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात सहकार्य
या दौऱ्यात मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्ट च्या सहाव्या संस्करणात मोदी आणि स्टार्मर दोघेही सहभागी होणार आहेत. या मंचावर भारत-ब्रिटन टेक्नॉलॉजी सेक्युरिटी इनिशिएटिव्ह (टीएसआय) अंतर्गत तंत्रज्ञान, दूरसंचार, एआय, क्वांटम संगणन, जैवतंत्रज्ञान आणि महत्त्वाच्या खनिजांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल.
ब्रिटनचे प्रतिनिधी रिचर्ड हील्ड म्हणाले, “ही यात्रा दोन्ही देशांमधील परस्पर सन्मान आणि समृद्धीवर आधारित संबंधांसाठी एक निर्णायक टप्पा आहे.” यूके इंडिया बिझनेस कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून ते लघु आणि मध्यम उद्योगांसाठी भारतात प्रवेश करण्याच्या धोरणावरही चर्चा करणार आहेत.
फरार आर्थिक गुन्हेगारांवर चर्चा
शिखर बैठकीत विजय माल्या आणि नीरव मोदी यांच्यासारख्या फरार आरोपींच्या प्रत्यार्पणाबाबत गंभीर चर्चा अपेक्षित आहे. अलीकडेच भारत सरकारने नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास गती देण्यासाठी ब्रिटनला नवीन आश्वासन दिले आहे.
संरक्षण आणि परराष्ट्र धोरण
लंडनच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजचे (आयआयएसएस) वरिष्ठ फेलो राहुल रॉय-चौधरी म्हणाले, “ही यात्रा 'कोंकण' नावाच्या संयुक्त नौदल सरावादरम्यान होत आहे. यामुळे संरक्षण तंत्रज्ञानात आणि नौदल सहकार्याच्या नव्या संधी खुल्या होतील.”त्यांनी सांगितले की भारत सध्या आपले परराष्ट्र धोरण अमेरिकेच्या प्रभावापासून थोडे दूर ठेवून युरोप आणि ब्रिटनकडे वळवत आहे, आणि ही यात्रा त्याचेच उदाहरण आहे.
ब्रिटिश भारतीय समुदाय आणि भविष्याची दिशा
ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या 20 लाख नागरिकांचे प्रतिनिधित्व करताना स्टार्मर यांची ही यात्रा भारतासोबत दीर्घकालीन आर्थिक व धोरणात्मक संबंधांच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. विशेष म्हणजे, ही यात्रा चीन दौऱ्याच्या अगोदर होत आहे.फिक्कीच्या महासंचालक ज्योती विज म्हणाले की, “सीईएटी अंतर्गत भागीदारीद्वारे प्रगत उत्पादन, हरित अर्थव्यवस्था, डिजिटल इनोव्हेशन आणि कौशल्ययुक्त व्यावसायिकांच्या संधी उघडतील.” ब्रिटनच्या व्यापार विभागाच्या (डीबीटी) ताज्या आकडेवारीनुसार, सध्या भारत-ब्रिटन यांच्यातील एकूण व्यापार सुमारे 44.1 अब्ज पाउंड आहे. पंतप्रधान मोदींच्या जुलैमधील ब्रिटन दौऱ्यात झालेल्या करारामुळे 2030 पर्यंत हा व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे.----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी