छत्तीसगड : विधानभवनाच्या नव्या इमारीचे मोदींच्या हस्ते लोकार्पण
रायपूर, 01 नोव्हेंबर (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शनिवारी नवा रायपूर येथे छत्तीसगडच्या नवीन विधानसभा भवनाचे लोकार्पण केले. सुमारे 273 कोटी रुपयांच्या खर्चाने आणि 3 वर्षांच्या कालावधीत बांधले गेलेले हे ‘इको-फ्रेंडली’ भवन पारंपरिक राजव
छत्तीसगड : विधानभवनाच्या नव्या इमारीचे मोदींच्या हस्ते लोकार्पण


रायपूर, 01 नोव्हेंबर (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शनिवारी नवा रायपूर येथे छत्तीसगडच्या नवीन विधानसभा भवनाचे लोकार्पण केले. सुमारे 273 कोटी रुपयांच्या खर्चाने आणि 3 वर्षांच्या कालावधीत बांधले गेलेले हे ‘इको-फ्रेंडली’ भवन पारंपरिक राजवाड्यांच्या शैलीत उभारण्यात आले आहे. या सोहळ्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मुख्यमंत्री विष्णुदेव साय, विधानसभा अध्यक्ष डॉ. रमन सिंह तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

तब्बल 27.78 हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेल्या या भव्य इमारतीत 13 गुमट्या आणि धानाच्या बाल्यांचे प्रतीकात्मक चिन्ह आहेत जे राज्याच्या समृद्ध इतिहास आणि कृषी परंपरेचे प्रतीक आहे. नवा रायपूरच्या सेक्टर 19 मध्ये उभारलेल्या या भवनात आधुनिक तंत्रज्ञानासह ऊर्जा व जलसंवर्धनाची सोय करण्यात आली आहे. समारंभाच्या सुरुवातीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी “जय जोहार” या घोषणेसह उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी म्हटले की, “विधानसभेच्या नवीन भवनाचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या करकमलांनी होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. हे भवन लोकशाही व्यवस्थेत सुधारणा आणि कार्यक्षमतेस हातभार लावेल.

मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी या प्रसंगी पंतप्रधानांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना सांगितले की, “मोदीजींनी भारताची अर्थव्यवस्था जगात अकराव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर नेली आहे. ते कोणालाही विनाकारण छेडत नाहीत, पण जो त्यांना छेडतो त्याला सोडत नाहीत. लोकार्पणावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मातोश्रींच्या नावाने वृक्षारोपण केले आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

विधान भवनाच्या इमारतीत तीन मुख्य ब्लॉक असून, सचिवालय, सभागृह, मंत्री व आमदारांची कार्यालये, आधुनिक सभागृह, सेंट्रल हॉल, हाय-टेक ग्रंथालय, संग्रहालय, कला दालन तसेच 500 आसन क्षमतेचे ऑडिटोरियम अशी विविध सुविधा आहेत. संपूर्ण कामकाज ‘पेपरलेस वर्क सिस्टीम’द्वारे होणार असून, हे भवन छत्तीसगडच्या नव्या प्रशासनिक अध्यायाची सुरुवात दर्शवते.-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande