‘कमर्शिअल’ गॅस सिलेंडरच्या दरात कपात
नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्ली, मुंबईपासून पटना, लखनऊ आणि कोलकाता पर्यंत एलपीजी गॅस सिलिंडरचे दर 5 ते 5.50 रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे देशातील लाखो ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. देशात आज, शनिवारी 1 नोव्हेंबरपासून झालेल्या बदला
संग्रहित लोगो


नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्ली, मुंबईपासून पटना, लखनऊ आणि कोलकाता पर्यंत एलपीजी गॅस सिलिंडरचे दर 5 ते 5.50 रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे देशातील लाखो ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

देशात आज, शनिवारी 1 नोव्हेंबरपासून झालेल्या बदलांमध्ये एलपीजी सिलिंडरबाबतही एक महत्त्वाचा बदल झाला आहे. एलपीजी सिलिंडर आता स्वस्त झाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी घरगुती आणि व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर केले आहेत. इंडियन ऑइलच्या संकेतस्थळानुसार, दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये 19 किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत, तर 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दिल्ली, मुंबई, पटना, लखनौ आणि कोलकाता येथे 19 किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरचे दर पाच ते साडेपाच रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे कमर्शियल गॅस सिलिंडर वापरणाऱ्या लाखो ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या एका वर्षात त्याच्या किंमतीत सुमारे 200 रुपयांची घसरण झाली आहे. हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक ठिकाणी वापर करणाऱ्यांसाठी ही मोठी सवलत ठरली आहे.

देशातील 4 मोठ्या शहरांमध्ये 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किंमती कुठे 5 रुपये तर कुठे 5.50 रुपये इतक्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.

दिल्लीमध्ये जुनी किंमत 1595.50 रुपये होती, जी आता 5 रुपयांनी घटून 1590.50 रुपये झाली आहे.

कोलकात्यात 19 किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत 1700.50 रुपयांवरून 1694 रुपये झाली आहे. मुंबईत पूर्वी कमर्शिअल सिलेंडर 1547 रुपये होता, आता तो 1542 रुपयांना मिळेल. तर

चेन्नईत सिलेंडरचे दर 1754.50 रुपये होते. त्यात घट होऊन आता 1750 नवे दर रुपये झाले आहेत. त्यासोबतच देशातील इतर शहरांमध्येही कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये घट झाली आहे. ---------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande