दिल्ली बॉम्बस्फोटांनंतर प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्या १५ आरोपींना अटक
दिसपुर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।केंद्र सरकारने दिल्ली कार बॉम्बस्फोटाला दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केले आहे. तपास यंत्रणा देशभरात विविध ठिकाणी छापेमारी करून दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करत आहेत. दरम्यान, आसाममध्ये दिल्ली स्फोटाशी संबंधित भडकाऊ आणि आक्
दिल्ली बॉम्बस्फोटांनंतर सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट करणाऱ्या आसाममधील १५ आरोपींना अटक


दिसपुर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।केंद्र सरकारने दिल्ली कार बॉम्बस्फोटाला दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केले आहे. तपास यंत्रणा देशभरात विविध ठिकाणी छापेमारी करून दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करत आहेत. दरम्यान, आसाममध्ये दिल्ली स्फोटाशी संबंधित भडकाऊ आणि आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्या १५ जणांना अटक करण्यात आली आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती देताना लिहिले की, “दिल्ली स्फोटानंतर आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या संदर्भात आतापर्यंत आसामभरात १५ लोकांना अटक करण्यात आली आहे.”

मुख्यमंत्री बिस्वा यांच्या मते,मंगळवारी करण्यात आलेल्या ६ अटकांव्यतिरिक्त रात्री दरम्यान रफीजुल अली (बोंगाईगाव), फोरिद उद्दीन लस्कर (हैलाकांडी), इनामुल इस्लाम (लखीमपूर), फिरोज अहमद, पापोन (लखीमपूर), शाहिल शोमन सिकदर, शाहिदुल इस्लाम (बारपेटा), रकीबुल सुल्तान (बारपेटा), नसीम अकरम (होजई), तस्लीम अहमद (कामरूप), अब्दुर रोहीम मोल्ला, बप्पी हुसेन (दक्षिण सलमारा) यांना अटक करण्यात आली आहे. ही अटक मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या निर्देशानंतर काही तासांतच करण्यात आली.

त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते की, “दिल्ली स्फोटानंतर काही लोकांनी फेसबुकवर या हल्ल्याचे समर्थन करणारे इमोजी आणि संदेश पोस्ट केले आहेत. हे दहशतवादाला प्रोत्साहन देणारे कृत्य आहे. आम्ही त्यांची ओळख पटवत आहोत आणि जर ते आसामचे असतील तर त्यांना अटक केली जाईल.”

मुख्यमंत्र्यांनी राज्याचे डीजीपी (पोलीस महासंचालक) यांना सर्व अशा अकाउंट्सची तपासणी करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी इशारा दिला की, “दहशतवादी घटनांचे महिमामंडन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.”आसाम सरकारने स्पष्ट केले आहे की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.

दरम्यान, दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासणीचे काम सुरूच आहे. सोशल मीडियावर द्वेष आणि हिंसा पसरवणाऱ्यांवरही लक्ष ठेवले जात आहे. जे लोक अशा प्रकारे द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे.पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्ट शेअर करू नका, आणि संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ द्या

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande