दिल्ली बॉम्बस्फोटाचे तार सोलापूरच्या आयटी अभियंत्यापर्यंत
कोंढवा आणि मुंब्रा येथे एटीएसची कारवाई; दोन संशयित ताब्यात सोलापूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्लीतील अलीकडील बॉम्बस्फोट प्रकरणानंतर महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथक (एटीएस) सतर्क झाले असून, तपासाची सूत्रे सोलापूरपर्यंत पोहोचली आहेत. एटीएसने पुण्य
नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण  स्फोट


कोंढवा आणि मुंब्रा येथे एटीएसची कारवाई; दोन संशयित ताब्यात

सोलापूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्लीतील अलीकडील बॉम्बस्फोट प्रकरणानंतर महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथक (एटीएस) सतर्क झाले असून, तपासाची सूत्रे सोलापूरपर्यंत पोहोचली आहेत. एटीएसने पुण्याच्या कोंढवा आणि ठाण्याच्या मुंब्रा परिसरात संयुक्त कारवाई करून दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

या कारवाईचा संबंध सोलापूरच्या आयटी अभियंता जुबेर हंगरगेकर या संशयित व्यक्तीशी जोडला जात असल्याची माहिती पुढे आलीय.

हंगरगेकरचा अल-कायदाशी संबंध असल्याचा प्राथमिक संशय तपास पथकाने व्यक्त केला आहे.

एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान संशयितांकडून मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. दोघांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून चौकशी सुरू आहे.दरम्यान, तपासातून असेही समोर आले आहे की जुबेर हंगरगेकर १८ ते २० ऑक्टोबरदरम्यान सोलापुरात मुक्कामी होता. त्याने एका स्थानिक शाळेत १६ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शिबीर आयोजित केले होते. याच कालावधीत त्याच्या संपर्कात असलेल्या सोलापूरच्या आणखी एका आयटी अभियंत्याला एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.एटीएस या प्रकरणाचा दिल्ली व जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हालचालींशी काही संबंध आहे का, याचाही तपास करत आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande