फरीदाबादच्या अल-फलाह विद्यापीठाला नॅक कडून नोटीस
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासादरम्यान फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेने (नॅक) विद्यापीठाला खोटी मान्यता दाखविल्याबद्दल का
अल-फलाह विद्यापीठ फरीदाबाद


नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासादरम्यान फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेने (नॅक) विद्यापीठाला खोटी मान्यता दाखविल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. विद्यापीठाने आपल्या वेबसाइटवर खोटा दावा केला होता की त्यांच्या महाविद्यालयांना नॅककडून मान्यता प्राप्त आहे.

दिल्ली बॉम्ब स्फोटाच्या तपासात उघड झाले आहे की अल-फलाह विद्यापीठाने नॅककडून कोणतीही मान्यता मिळवलेली नाही, तसेच A&A चक्र-1 मध्येही सहभाग घेतलेला नाही. मात्र, त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर असे नमूद करण्यात आले होते की “अल-फलाह विद्यापीठ हे अल-फलाह चॅरिटेबल ट्रस्टचे एक उपक्रम आहे, जे कॅम्पसमध्ये 3 महाविद्यालये चालवते. अल-फलाह स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (1997 पासून, नॅक द्वारे ए- ग्रेड प्राप्त), ब्राउन हिल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (2008 पासून), आणि अल-फलाह स्कूल ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग (2006 पासून, नॅक द्वारे ए- ग्रेड प्राप्त). नॅकच्या म्हणण्यानुसार, हे दावे पूर्णपणे खोटे आहेत आणि त्यामुळे सार्वजनिक स्तरावर, विशेषतः पालक, विद्यार्थी आणि हितधारक यांची दिशाभूल होत आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीर पोलिस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांच्या संयुक्त पथकाने विद्यापीठाच्या परिसरात छापा टाकला. तपासादरम्यान कक्ष क्रमांक 4 आणि कक्ष क्रमांक 13 मधून दोन डायऱ्या जप्त करण्यात आल्या. या डायऱ्यांमध्ये काही गुप्त कोड (सीक्रेट कोड) लिहिलेले आढळले असून, त्यांचा दिल्ली स्फोटाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, हा ‘डॉक्टर मॉड्यूल’ नावाचा दहशतवादी गट देशातील 4 शहरांवर हल्ल्याची योजना आखत होता. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, प्रत्येक गटाला एका शहरातील स्फोटाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

----------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande