
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्ली–एनसीआरसह संपूर्ण देशात थंडीचा प्रभाव वाढत आहे. हवामान खात्याने अनेक राज्यांसाठी पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा दिला आहे. दरम्यान, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
दिल्ली–एनसीआरसह देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा प्रकोप वाढत चालला आहे. पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये 15 नोव्हेंबरपर्यंत थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. येत्या 24तासांत केरळ, तामिळनाडू आणि अंदमान-निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. उत्तर तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीप येथेही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात हिमवर्षावाची शक्यता व्यक्त केली आहे. लाहौल-स्पीती आणि मनाली येथे जड बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या अनेक भागांत किमान तापमान शून्य अंशाच्या खाली गेले आहे. उत्तराखंडातील चमोली, नैनीताल, मसूरी आणि रुद्रप्रयाग येथे थंडीची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या राज्यांमध्ये शीतलहरमुळे तापमान आणखी खाली जाण्याचा अंदाज आहे.दिल्ली–एनसीआर मध्ये हवामानापेक्षा प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. येथे धुक्यासोबतच स्मॉगनेही वातावरण व्यापले आहे. दिल्लीचा एक्यूआय अत्यंत गंभीर श्रेणीत (418) नोंदवला आहे, असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) म्हटले आहे हवामान विभागाच्या मते, जम्मू–काश्मीरमध्ये 16 नोव्हेंबर रोजी पुन्हा सक्रिय होणाऱ्या पश्चिमी विक्षोभामुळे हलक्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हिमवृष्टी आणि दाट धुक्याची स्थिती राहील.
उत्तर प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान स्वच्छ आहे. जोरदार ऊन असल्याने दिवसाचे तापमान सामान्य आहे, परंतु पछाड वाऱ्यांमुळे किमान तापमानात सलग दुसऱ्या दिवशी घट झाली आहे. हवामान खात्यानुसार, आज, गुरुवारपासून लखनऊसह पूर्व उत्तर प्रदेशातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये हलकी थंडी वाढेल. किमान तापमानात तीन अंश सेल्सियसपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे. बिहारमध्ये तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. सकाळ-संध्याकाळ धुके आणि थंडी जाणवते, तर दिवसा हलकी उष्णता जाणवते. हवामान विभागानुसार, डिसेंबरपासून पश्चिमी विक्षोभामुळे थंडी वाढण्याची शक्यता आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी