बिहारमध्ये काँग्रेसची स्थिती एमआयएमपेक्षा वाईट - फडणवीस
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर (हिं.स.) : बिहारच्या इतिहासातील काँग्रेसचा हा सर्वात कमी स्कोअर असून पक्षाची अवस्था एमआयएमपेक्षाही खाली गेली आहे. राहुल गांधी संवैधानिक संस्थांचा अपमान करत राहतील, तोपर्यंत काँग्रेसची हीच अवस्था राहील असा टोला मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर (हिं.स.) : बिहारच्या इतिहासातील काँग्रेसचा हा सर्वात कमी स्कोअर असून पक्षाची अवस्था एमआयएमपेक्षाही खाली गेली आहे. राहुल गांधी संवैधानिक संस्थांचा अपमान करत राहतील, तोपर्यंत काँग्रेसची हीच अवस्था राहील असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. बिहार विधानसभा निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

भारताच्या राजकारणातील महत्त्वाचे राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिहारमध्ये गेल्या पाच वर्षांत मोठ्या राजकीय उलथापालथी घडल्या. कधी राष्ट्रीय जनता दल (राजद) तर कधी भाजपसोबत राहणारे नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख चेहरे म्हणून पुढे आले आहेत. सरीकडे राजदचे नेते तेजस्वी यादव आपल्या पहिल्याच मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. निवडणुकीत बिहारच्या जनतेनं एनडीएला मोठे बहुमत दिल्याचे संकेत मिळत असून 2010 च्या विक्रमी कामगिरीलाही मागे टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.बिहारमधील राजकीय नाट्य, सतत बदलणारी आघाडी आणि नेत्यांचे फेरबदल यामुळे मतदारांसह विश्लेषकांनाही अनेकवेळा आश्चर्य आणि धक्का बसल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande