सीसीआयच्या कापूस मर्यादा वाढवा!
अकोला, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।सीसीआय मार्फत खरेदी करण्यात येत असलेल्या कापसाची उत्पादन मर्यादा १२ क्विंटल प्रति एकरी (३० क्विंटल प्रति हेक्टरी) इतकी वाढवून देण्याकरिता आमदार रणधीर सावरकर तसेच खासदार अनुप भाऊ धोत्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प


अकोला, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।सीसीआय मार्फत खरेदी करण्यात येत असलेल्या कापसाची उत्पादन मर्यादा १२ क्विंटल प्रति एकरी (३० क्विंटल प्रति हेक्टरी) इतकी वाढवून देण्याकरिता आमदार रणधीर सावरकर तसेच खासदार अनुप भाऊ धोत्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे तसेच सीसीआय महाप्रबंधाकडे खरेदी उत्पादन मर्यादा वाढवून देण्याकरिता चर्चा केलेली आहे.

‘महाराष्ट्र कृषी विभागाने चालु हंगाम सन 2025-26 मध्ये कापसाची उत्पादकता ही प्रती एकरी ५.६० क्विंटल ग्राह्य धरून पणन मंत्रालयामार्फत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाला पाठवली आहे. त्यानुसार सीसीआयने चालु हंगामातील प्रती हेक्टरी 13.57 क्विंटल ग्राह्य धरून कापुस खरेदीची मर्यादा जाहीर केली. परंतु, अकोला जिल्हा मुख्यत्वे कापूस उत्पादक असल्याने प्रत्यक्षात जिल्ह्यातील शेतकरी हा प्रती हेक्टरी सरासरी 25 ते 40 क्विंटल कापसाचे उत्पन्न घेतात, त्यामुळे सीसीआयने खरेदीसाठी ५.६० क्विंटल प्रति एकर घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक उत्पादित कापसाची विक्री खुल्या बाजारात शेतकऱ्यांना कमी भावात विकण्याची पाळी येऊ नये असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकल्याने सीसीआयमार्फत कापूस विक्री करीता मोठी अडचण निर्माण झाली आहे. आमदार रणधीर सावरकर तसेच खासदार अनुपजी धोत्रे यांनी मुख्यमंत्री व सीसीआयच्या संचालकांसोबत केलेल्या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, आमदार रणधीर सावरकर व खासदार अनुपजी यांनी पुन्हा एकदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सीसीआयने (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) जाहीर केलेली कापूस खरेदीची मर्यादा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक असून ही मर्यादा मागच्या वर्षीप्रमाणे कायम ठेवावी,

अशी आग्रही मागणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande