अकोला : तत्कालीन आरोग्य उपसंचालकांवर फौजदारी कारवाई करा-राष्ट्रवादी काँग्रेस
अकोला, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।अकोला मंडळाचे तत्कालीन आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. गाढवे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या(श. प.) पक्
प


अकोला, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।अकोला मंडळाचे तत्कालीन आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. गाढवे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या(श. प.) पक्षाचे राज्य प्रवक्ता ॲड.फ़ैझान मिर्झा यांनी अकोल्यातील रामदास पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे..

मिर्झा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तत्कालीन आरोग्य उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी, आरोग्य अधिकारी गाढवे यांनी सरळ सेवा भरती २०२४ घोटाळा जनतेच्या लक्षात येऊ नये म्हणून, अकोला येथील जिल्हा महिला रुग्णालयातील निविदा अनियमितता प्रकरणात तीन निर्दोष अधिकाऱ्यांचे निलंबन केले होते.. ज्यामध्ये माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा महिला रुग्णालय, अकोलाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयंत पाटील आणि प्रशासकीय अधिकारी डांबरे यांचा समावेश होता. डॉ. कमलेश भंडारी, डॉ. गाढवे आणि संपूर्ण चौकशी समितीने सरकारला बोगस अहवाल सादर करून या तिघांना निलंबित करण्याचा कट रचल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या चौकशी अहवालात त्यांनी सरकारला खोटी माहिती दिली. ज्यामध्ये प्रशासकीय मान्यता असलेल्या जिल्हा महिला रुग्णालयाच्या निविदेला प्रशासकीय मान्यता नाही. ज्या निविदेत सरकारने पैसे दिले नाहीत आणि कोणतेही बिल दिले गेले नाही त्यात भ्रष्टाचार कसा होऊ शकतो? असा सवालही करण्यात आला आहे.. खरं तर, तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वारे यांच्या पदोन्नतीची फाइल सरकारकडे प्रलंबित होती आणि कमलेश भंडारी यांच्याविरुद्धच्या तक्रारींमुळे, डॉ.वारे यांना अकोला येथील आरोग्य सेवा उपसंचालक पदावर बढती मिळण्याची शक्यता होती. डॉ. वारे यांच्या आगमनाने सरळ सेवा भरती घोटाळा उघड होऊ नये म्हणून भंडारी आणि गाढवे यांनी बनावट चौकशी अहवाल पाठवून सरकारला ३ निर्दोष अधिकाऱ्यांना निलंबित करण्यास भाग पाडले. असा आरोपही मिर्झा यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.. त्यामुळे आता याप्रकरणी नेमकी काय कारवाई होते.. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande