
बीड, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।
अंबाजोगाई नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी नंदकिशोर मुंदडा यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
नंदकिशोर मुंदडा यांच्यासह सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणण्याचा केला निर्धार केला आहे
अंबाजोगाई नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर ज्येष्ठ नेते तथा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा (काकाजी) यांच्या नेतृत्वावर वाढत असलेला तरुणांचा विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे. शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असलेल्या तरुणांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश करून त्यांच्या प्रचाराला निर्णायक वेग दिला आहे. निवडणुकीत विकास, पारदर्शकता आणि प्रतिसादक्षम नेतृत्व यांना प्राधान्य देणाऱ्या तरुणांनी नंदकिशोर मुंदडा यांच्या नेतृत्वाखालील टीमला संपूर्ण पाठींबा जाहीर केला आहे.
निवडणुकीच्या अगदी तोंडावर तरुणांचा मोठ्या प्रमाणात होत असलेला प्रवेश नंदकिशोर मुंदडा यांच्या प्रचाराला निर्णायक बळ देणारा घटक ठरला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis