
रत्नागिरी, 15 नोव्हेंबर, (हिं. स.) : भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह जिल्हा उपाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
श्री. भोसले यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षाचा राजीनामा दिला असून, या निर्णयामुळे नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
भोसले उद्या (रविवारी) राजीनाम्याची कारणे आणि पुढील राजकीय भूमिका याबाबत पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करणार आहेत.
परिमल भोसले हे पक्षातील सक्रिय आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे भाजपच्या नगरपरिषद निवडणुकीतील रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी