
परभणी, 15 नोव्हेंबर (हिं.स.) आ.डॉ.राहुल पाटील यांच्या परभणी मेडिकल कॉलेज व आर पी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे प्रथम वर्ष एम.बी.बी.एस विद्यार्थ्यांसाठी 'व्हाईट कोट सेरेमनी'चा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
श्री.धनेश्वरी मानवविकास मंडळाचे मार्गदर्शक तथा माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. परभणी मेडिकल कॉलेज चे अधिष्ठाता डॉ प्रमोद शिंदे, डॉ. मगर, डॉ.अमृत महाजन,डॉ देगलूरकर,डॉ अमीर तडवी उपस्थित होते.
महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकारी गुणवंत अहिरे यांनी महाविद्यालयाची आतापर्यंतची वाटचाल आणि प्राप्त यशांची सविस्तर माहिती दिली. डॉ. इमरान सय्यद (ॲनाटॉमी एच.ओ.डी ),डॉ. बिराजदार (फिजिओलॉजी एचओडी), डॉ.माधव कदम (बायोकेमिस्ट्री एच.ओ.डी), डॉ. किरण सगर (मायक्रोबायोलॉजी एच.ओ.डी), डॉ. दमकोडवार, डॉ. सोनल देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वाचे संदेश दिले.
अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे म्हणाले, “व्हाईट कोट हा केवळ पोशाख नाही, तर रुग्णसेवेची, करुणा आणि समर्पणाची शपथ आहे. तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेताना रुग्णांच्या दुःखाला आपले समजून त्यांची सेवा करा. कठोर परिश्रम, शिस्त आणि सतत अभ्यास हाच यशाचा मंत्र आहे.”
डॉ. वेदप्रकाश पाटील म्हणाले, “श्री. धनेश्वरी मानवविकास मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हे महाविद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार वैद्यकीय शिक्षण देण्याचे ध्येय घेऊन कार्यरत आहे. व्हाईट कोट सेरेमनी हा वैद्यकीय जीवनातील पहिला टप्पा आहे. तुम्ही डॉक्टर म्हणून समाजाच्या सेवेत अग्रेसर राहा. आपल्या जीवनात वाईट प्रथांना थारा देऊ नका आणि एकमेकांना प्रोत्साहन द्या. महाविद्यालय तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”
डॉ. विवेक कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॉडेल ऑफिसर विशाल आहेर यांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis