रत्नागिरी : सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्यासाठीच महायुती - आ. निरंजन डावखरे
रत्नागिरी, 15 नोव्हेंबर, (हिं. स.) : देवरूख नगरपंचायत निवडणूक ही खऱ्या अर्थाने पक्षासाठी समर्पण करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांला बळ देण्यासाठीच आहे. हे लक्षात घेऊनच भाजपा, शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), आरपीआय यांची महायुती
रत्नागिरी : सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्यासाठीच महायुती - आ. निरंजन डावखरे


रत्नागिरी, 15 नोव्हेंबर, (हिं. स.) : देवरूख नगरपंचायत निवडणूक ही खऱ्या अर्थाने पक्षासाठी समर्पण करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांला बळ देण्यासाठीच आहे. हे लक्षात घेऊनच भाजपा, शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), आरपीआय यांची महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवली जात आहे. युती करताना सर्वच आपल्या मनाप्रमाणे होत नसते. त्यामुळे काहींवर अन्याय झाला असला तरीही युती धर्म पाळला जाईल. तसेच देवरूख नगरपंचायतीवर पुन्हा एकदा युतीचा झेंडा फडकवण्यासाठी मनभेद व मतभेद विसरून एकत्र येऊन काम करा, असे आवाहन भाजपाचे कोकण निवडणूक प्रभारी व विधान परिषद आमदार निरंजन डावखरे यांनी केले.

नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी देवरूखमध्ये महायुती निश्चित झाल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी मृणाल शेट्ये यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यावेळी शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्यावेळी आमदार डावखरे बोलत होते. यावेळी आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, भाजप नेते प्रशांत यादव, भाजप पक्ष निरीक्षक अतुल काळसेकर, माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित महायुतीचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामदैवत सोळजाई देवीला श्रीफळ अर्पण करून बाजारपेठ, राजवाडे चौक, शिवाजी चौक मार्गे मिरवणूक काढण्यात आली. आमदार डावखरे म्हणाले, देवरूखमध्ये महायुती भक्कम आहे; मात्र घटक पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याने आणि उमेदवारांनी गाफील राहू नये. पुढील प्रत्येक दिवस अहोरात्र मेहनत घ्यावी. प्रत्येक मतदाराच्या घराघरात जा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. कोणतेही मतभेद असतील किंवा नाराजी असेल तर बाजूला ठेवून महायुती म्हणून एकत्रितपणे काम करा, असे आवाहन त्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande