
बीड, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।
माजलगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी सय्यद नाझीम अझीमोद्दीन यांची निवड करण्यात आली.पक्ष संघटना अधिक सक्षम व भक्कम करण्यासाठी आपण नक्कीच मोलाचे योगदान द्याल, असा विश्वास आहे. असे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले आहे
त्याचबरोबर श्री. देवानंद शिंदे व निळकंठ भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून पक्षाची ताकद अधिक वाढवली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ही निवड केली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis