पाथरी:आसेफ खान यांनी नगराध्यक्ष पदासाठी दाखल केला अर्ज
परभणी, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। पाथरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांचे बंधू आसेफ भैय्या खान यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोल
पाथरी नगरपरीषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांचे बंधू आसेफ भैय्या खान यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना खान म्हणाले की माझे वडील बिरबल खान  यांनी मला दिलेले आपुलकीचे संस्कार यामधून त्यांचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी  आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात अनेक समाजहित योजना आखून लाडक्या बहिणींना व युवकांना रोजगार मिळवून दिला.   त्यांच्याच आशिर्वादाने पाथरीत मी अनेक वर्ष विकासहिन पाथरीला विकासाच्या प्रवाहात आणले आहे. अनेक कोटी रुपये मंजूर केले, युवकांसाठी नोकरी महोत्सव घेउन नोकरी मिळवून दिली. या अनेक समाजपयोगी कामामुळे पाथरीकर खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत, नगराध्यक्ष व नगरसेवकांना मतदान रुपी आशिर्वाद देऊन काम करण्याची संधी देतील ही खात्री आहे.  यावेळी पक्ष निरिक्षक आनंद जाधव  नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.


परभणी, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। पाथरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांचे बंधू आसेफ भैय्या खान यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी बोलताना खान म्हणाले कीमाझे वडील बिरबल खान यांनी मला दिलेले आपुलकीचे संस्कार यामधून त्यांचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात अनेक समाजहित योजना आखून लाडक्या बहिणींना व युवकांना रोजगार मिळवून दिला.

त्यांच्याच आशिर्वादाने पाथरीत मी अनेक वर्ष विकासहिन पाथरीला विकासाच्या प्रवाहात आणले आहे. अनेक कोटी रुपये मंजूर केले, युवकांसाठी नोकरी महोत्सव घेउन नोकरी मिळवून दिली. या अनेक समाजपयोगी कामामुळे पाथरीकर खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत, नगराध्यक्ष व नगरसेवकांना मतदान रुपी आशिर्वाद देऊन काम करण्याची संधी देतील ही खात्री आहे.यावेळी पक्ष निरिक्षक आनंद जाधव नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande