अमरावतीत किन्नर महामंडलेश्वरांच्या बळजबरी धर्मांतराचा प्रकार धक्कादायक - खा.डॉ.अनिल बोंडे
अमरावती, 15 नोव्हेंबर (हिं.स.) अमरावतीमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. येथील किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर श्री श्री माँ मातंगी नंदागिरी आणि त्यांच्या शिष्यांचे बळजबरीने मुस्लिम धर्मात धर्मांतरण करण्यात आल्याचा आरोप आहे.
अमरावतीत किन्नर महामंडलेश्वरांच्या बळजबरी धर्मांतराचा गंभीर प्रकार!  संपूर्ण प्रकार अत्यंत धक्कादायक - खा.डॉ.अनिल बोंडे


अमरावती, 15 नोव्हेंबर (हिं.स.)

अमरावतीमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. येथील किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर श्री श्री माँ मातंगी नंदागिरी आणि त्यांच्या शिष्यांचे बळजबरीने मुस्लिम धर्मात धर्मांतरण करण्यात आल्याचा आरोप आहे. या पीडित तृतीयपंथीयांनी भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

काय आहे नेमका प्रकार?

अमरावती येथील रेणुका किन्नर बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा असलेल्या महामंडलेश्वर माँ मातंगी नंदागिरी आणि त्यांची शिष्या किंजल पाटील (27) यांचे मुस्लिम धर्मात धर्मांतरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 3 जुलै 2025 रोजी अमरावतीतील साबणपुरा येथे राहणाऱ्या रफिक हाजी उर्फ सोनाबाई यांच्या माध्यमातून अचलपूर येथे हे बळजबरीचे धर्मांतरण घडवण्यात आल्याचा नंदागिरी यांचा आरोप आहे.

नंदागिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रफिक हाजी उर्फ सोनाबाई, परवीन जान आणि छोटू उर्फ ममता या लोकांनी त्यांचा 'ब्रेन वॉश' करून धर्मांतरासाठी प्रवृत्त केले. यानंतर, त्यांना अचलपूर येथे नेऊन एका डेऱ्यात मुस्लिम धर्मातील विधीनुसार बळजबरीने 'कलमा' वाचायला लावून धर्मांतरण करण्यात आले आणि त्रासही देण्यात आला.

इतकंच नाही, तर नंदागिरी यांच्या सहकारी शिष्या आम्रपाली चौधरी यांच्यावरही धर्मांतरणासाठी दबाव टाकण्यात आल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे.हा संपूर्ण प्रकार उघडकीस येण्यापूर्वीच, अमरावतीच्या निंभोरा भागात राहणाऱ्या 20 तृतीयपंथीयांनी या संदर्भात 5 नोव्हेंबर 2025 रोजी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पोलिसांकडून या गंभीर प्रकरणात 'अक्षम्य दुर्लक्ष' झाल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.

महामंडलेश्वरांचे 'घरवापसी' आणि जीवाला धोका

महामंडलेश्वरांचे 'घरवापसी' आणि जीवाला धोकाधर्मांतरामुळे होणारा त्रास वाढल्याने, माँ मातंगी नंदागिरी यांनी प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्यामध्ये पुन्हा हिंदू धर्मात परतण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रयागराज येथे त्यांचा 'पट्टाभिषेक' करण्यात आला.

पण, हिंदू धर्मात परतल्यानंतरही रफिक हाजी उर्फ सोनाबाई या व्यक्तीकडून त्यांना त्रास देणे सुरूच आहे. त्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत, नंदागिरी यांनी पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande