‘रायरेश्‍वर’च्या दोन विद्यार्थीनींची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड
परभणी, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। क्रीडा व सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या विभागीय मैदानी स्पर्धेत धर्मापुरी येथील रायरेश्‍वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील श्
‘रायरेश्‍वर’च्या दोन विद्यार्थीनींची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड


परभणी, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। क्रीडा व सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या विभागीय मैदानी स्पर्धेत धर्मापुरी येथील रायरेश्‍वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील श्रीशा सुनीलराव देशमुख हीने 4 किमी डिव्हिजन क्रॉस कंट्रीमध्ये तिसरा तर पुनम भगवानराव तिथे हीने चौथा क्रमांक पटकावला असून त्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष तथा प्राचार्य किरण सोनटक्के व संस्था सचिव तथा प्राचार्य सौ. शितल सोनटक्के यांच्यासह सर्व समन्वयक, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे व प्रशिक्षक मार्गदर्शकाचे अभिनंदन केले असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande