लातूरात २२५ ई चलान केसेस करुन १ लाख ७८ हजार ८५० रुपयांचा दंड
लातूर, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।लातूर शहरात नियमबाह्य वाहनावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.एका दिवसात २२५ ई चलान केसेस करुन १ लाख ७८ हजार ८५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. लातूर शहरातील नियम बाह्य वाहनावर बेशिस्त
लातूरात २२५ ई चलान केसेस करुन १ लाख ७८ हजार ८५० रुपयांचा दंड


लातूर, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।लातूर शहरात नियमबाह्य वाहनावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.एका दिवसात २२५ ई चलान केसेस करुन १ लाख ७८ हजार ८५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

लातूर शहरातील नियम बाह्य वाहनावर बेशिस्त पार्क करणारे चार-चाकी, दुचाकी वाहनावर तसेच बेशिस्तपणे रिंग रोडचे सर्व्हिस रोडवर वाहन पार्कीग करणारे वाहनावर वाहतुक नियंत्रण शाखा, लातूर यांचेकडून ई-चलान मशिनव्दारे दंडात्मक कार्यवाहीची १५ दिवस विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनात ऑटोरिक्षा यांच्या मागील ई-चलान मशिनद्वारे दंडात्मक कारवाई केलेला पुर्वीचा दंड वसूल करण्याबाबत विशेष मोहीम राबवण्यात आली, तसेच विविध हेडखाली कारवाई करून एका दिवसात २२५ ई चलान केसेस करुन १ लाख ७८ हजार ८५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. याच दिवशी इंटर सेप्टर वाहनाव्दारे ओव्हर स्पीड केसेस ६० केसेस एकुण दंड- १ लाख २० हजार रुपये करण्यात आले. ज्या ऑटोरिक्षाचे अनपेड ई-चलान भरणे थकीत असलेले केसेसचा दंड (सेंन्ड टू कोर्ट करून) न्यायालयात त्यांचे विरुद्ध खटले दाखल करण्यात येत आहेत.

लातूर शहरातील ऑटोरिक्षा, खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनधारकांनी व जनतेनी वाहतुकीच्या नियमांचे

पालण व वाहनाची कागदपत्रे सोबत ठेवावीत, असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे. ही मोहीम आणखी तीव्र होणार असुन त्यानंतरही कायम चालु राहणार आहे. सदरची कामगिरी ही उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे व त्यांचे अधिनस्थ अधिकारी व अंमलदार हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande