मालेगावमध्ये पाच लाखांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या दोघांना अटक
मालेगाव, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। तालुका पोलिसांपाठोपाठ किल्ला पोलिसांनी शहरातील तांबा काटा परिसरातुन सुमारे पाच लाख ५६ हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या दोघांना अटक केली आहे. शहरातील तांबा काटा परिसरात बनावट नोटा विक्रीच्या हेतूने दोन इ
मालेगावमध्ये पाच लाखांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या दोघांना अटक


मालेगाव, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। तालुका पोलिसांपाठोपाठ किल्ला पोलिसांनी शहरातील तांबा काटा परिसरातुन सुमारे पाच लाख ५६ हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

शहरातील तांबा काटा परिसरात बनावट नोटा विक्रीच्या हेतूने दोन इसम आले असल्याची माहिती किल्ला पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार किल्ला पोलिसांनी सापळा रचून धनराज नारायण धोटे, राहुल कृष्णराव आंबेटकर (रा. वर्धा) यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून पाच लाख ५६ हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यापूर्वी देखील तालुका पोलिसांनी बनावट नोटा बाळगणाऱ्यांचे रॅकेट उघडकीस आणले होते. दुसऱ्यांदा झालेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. बनावट नोटांचे मोठे सिंडिकेट असल्याचे या तपासावरून उघडकीस येत आहे. याप्रकरणी पुढील तपास किल्ला पोलीस करीत आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी मालेगाव पोलिसांनी पकडलेल्या दोन आरोपींचे थेट मध्य प्रदेशातील मशिदीमध्ये संबंध असल्याचे समोर आले होते. त्या ठिकाणी देखील पोलिसांनी छापा टाकून या ठिकाणी असलेल्या मौलवीला अटक केलेली होती. त्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणावरती मिळालेली ही रक्कम बनावट असली तरी पुन्हा मालेगाव मध्ये अशा स्वरूपाच्या नोटा आणण्याचे काय कारण आहे. याचा तपास पोलीस करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande