दिल्ली स्फोट : आमिर राशिद अलीला एनआयए कोठडी
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार ब्लास्ट प्रकरणात ड्रायव्हर उमर मोहम्मद उर्फ उमर उर नबीचा सहकारी आमिर राशिद अली याला दिल्लीच्या न्यायालयाने 10 दिवसांच्या एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) ताब्यात पाठवले आहे. आ
दहशतवादी आमिर राशिद अली


नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार ब्लास्ट प्रकरणात ड्रायव्हर उमर मोहम्मद उर्फ उमर उर नबीचा सहकारी आमिर राशिद अली याला दिल्लीच्या न्यायालयाने 10 दिवसांच्या एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) ताब्यात पाठवले आहे. आमिरला एनआयएने रविवारी दिल्लीमधून अटक केली होती.

एनआयएने आमिरला आज, सोमवारी दिल्ली न्यायालयात हजर केले आणि त्याची कस्टडी मागितली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने एनआयएला 10 दिवसांची ताबा दिला. एनआयएच्या चौकशीत आमिरकडून अनेक महत्त्वाच्या दुव्यांवर प्रकाश पडण्याची शक्यता आहे.

आमिर राशिद अली हा जम्मू-कश्मीरमधील पंपोरच्या संबूरा येथील रहिवासी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एनआयएच्या तपासात उघड झाले आहे की आमिरने उमर उर नबीसोबत मिळून दहशतवादी हल्ल्याची साजिश रचली होती. एका निवेदनात सांगण्यात आले, “ज्या कारमध्ये स्फोट झाला, त्या कारची खरेदी करण्यात मदत करण्यासाठी आमिर दिल्लीला आला होता.” या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात एनआयएला आमिरची अटक ही मोठी सफलता मानली जात आहे. दिल्ली पोलिसांकडून प्रकरण आपल्या हाती घेतल्यानंतर एनआयएने व्यापक शोधमोहीम राबवली होती.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबरला झालेल्या कार ब्लास्टमध्ये किमान 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. हा स्फोट फरीदाबादमधील दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड झाल्यानंतर काही तासांतच झाला होता, ज्यात डॉ. मुजम्मिल आणि शाहीन यांच्यासह सात जणांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावर अटक करण्यात आली होती.

कार ब्लास्टमध्ये सहभागी असलेला उमर याचाही फरीदाबादच्या दहशतवादी मॉड्यूलशी संबंध असल्याचे समोर आले होते. त्यानंतर सरकारने दिल्ली कार ब्लास्टला दहशतवादी हल्ला घोषित करून तपास एनआयएला सोपवला. एनआयए या प्रकरणात 70 पेक्षा जास्त लोकांची चौकशी करून झाली असून आणखी संशयितांची चौकशी व अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.-------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande