
अमरावती, 17 नोव्हेंबर (हिं.स.)
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या केलेल्या मूल्यांकनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अनुत्तीर्ण ठरले आहे. या मूल्यांकनात पुणे विद्यापीठ शेवटच्या स्थानी असून, गोंडवाना विद्यापीठाने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर अमरावतीचे संत गाडगेबाबा विद्यापिठ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
त्या खालोखाल मुंबई विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठाने स्थान मिळवले आहे. या मूल्यांकनातील गुणांकन पाहता विद्यापीठांनी निकष पूर्ततेकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. सेवाशर्ती कार्यक्रमाअंतर्गत आकृतिबंध, सेवा प्रवेश नियम, अद्ययावत ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करणे, पदोन्नतीने नियुक्तीची स्थिती, सरळसेवा नियुक्ती रिक्त पद स्थिती, बिदुनामावली प्रमाणीकरण, अनुकंपा नियुक्ती, आयजीओटी पोर्टलवर नोंदणी आणि पाच अभ्यासक्रम पूर्ण करणे, सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत करून डिजिटल करणे या निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. राज्यातील सार्वजनिकविद्यापीठांमध्ये गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने सर्वाधिक ६८ गुणांसह क्रमवारीत अग्रस्थान पटकावले. तर मुंबई विद्यापीठ आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने प्रत्येकी ६६ गुण मिळवले. अमरावतीच्या संत डगेबाबा विद्यापीठाला ६२, नाशिकच्या बव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला ६०, . एन. डी. टी. महिला विद्यापीठाला ५७, मी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला ५६, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूरं विद्यापीठाला ५४, रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाला प्रत्येकी ५२, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला ५०, तर जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला ४८ गुण मिळाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ४२ गुणांसह सर्वांत शेवटच्या स्थानी आहे. पुणे विद्यापीठाला आकृतिबंध, आयजीओटी पोर्टलवर नोंदणी व ५ कोर्सअभ्यासक्रम अभ्यासक्रम पूर्ण करणेकरणे, कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत व डिजिटल करणे या तीन गटांत १० पैकी शून्य गुण मिळाले आहेत. आकृतिबंध या निकषावर केवळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या एकमेव विद्यापीठाला दहा गुण मिळाले असून, उर्वरित सर्व विद्यापीठांना शून्य गुण मिळाले आहेत. तर आयजीओटी पोर्टलवर नोंदणीव५ अभ्यासक्रम पूर्ण करण्यात एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाला एक गुण, गोंडवाना विद्यापीठाला दोन गुण मिळाले असून, उर्वरित सर्व विद्यापीठांना शून्य गुण आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी