बनावट पॅन कार्ड प्रकरणात आझम खान आणि त्यांच्या मुलाला प्रत्येकी ७ वर्षांची शिक्षा
लखनऊ, 17 नोव्हेंबर (हिं.स.) सपा नेते आझम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला यांना प्रत्येकी ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रामपूरच्या खासदार-आमदार न्यायालयाने बनावट पॅन कार्ड प्रकरणात त्यांना दोषी ठरवले आहे. त्यानंतर लगेचच शिक्षा जाहीर करण्यात
बनावट पॅन कार्ड प्रकरणात आझम खान आणि त्यांच्या मुलाला ७ वर्षांची शिक्षा


लखनऊ, 17 नोव्हेंबर (हिं.स.) सपा नेते आझम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला यांना प्रत्येकी ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रामपूरच्या खासदार-आमदार न्यायालयाने बनावट पॅन कार्ड प्रकरणात त्यांना दोषी ठरवले आहे. त्यानंतर लगेचच शिक्षा जाहीर करण्यात आली. न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी ५०,००० रुपयांचा दंडही ठोठावला. निकालानंतर पोलिसांनी आझम खान आणि अब्दुल्ला यांना कोर्टरूममध्ये ताब्यात घेतले. आझम खान यांची दोन महिन्यांपूर्वी, २३ सप्टेंबर रोजी सीतापूर तुरुंगातून सुटका झाली होती, तर त्यांचा मुलगा अब्दुल्ला नऊ महिन्यांपूर्वी हरदोई तुरुंगातून सुटका झाली होती. आता, दोघेही तुरुंगात परततील.

बनावट पॅन कार्ड प्रकरण २०१९ चे आहे. भाजप नेते आकाश सक्सेना यांनी रामपूरमधील सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आणि असा आरोप करण्यात आला होता की, आझम यांनी त्यांचा मुलगा अब्दुल्ला निवडणूक लढवू शकतील यासाठी दोन वेगवेगळ्या जन्म प्रमाणपत्रांवर आधारित दोन पॅन कार्ड मिळवले होते. १ जानेवारी १९९३ या त्यांच्या मूळ जन्मतारखेनुसार, अब्दुल्ला २०१७ मध्ये निवडणूक लढवण्यास अपात्र होते. त्यांचे वय अद्याप २५ वर्षे पूर्ण झालेले नव्हते. त्यामुळे आझम यांनी दुसरे पॅन कार्ड मिळवले, ज्यामध्ये त्यांचे जन्मवर्ष १९९० दर्शविले गेले.

निकालानंतर आमदार आकाश सक्सेना म्हणाले, मी हा सत्याचा विजय मानतो. आझम यांच्याविरुद्धचे सर्व खटले कागदोपत्री पुराव्यांवर आधारित आहेत. त्यांच्याविरुद्ध पुराव्याशिवाय कोणताही खटला चालत नाही. म्हणूनच न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली. त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा त्यांना मिळेल.

जर शिक्षा पाच वर्षांची असती, तर न्यायालय त्यांना जामिनावर सोडू शकले असते, कारण त्यांनी आधीच पाच वर्षे शिक्षा भोगली होती. पण या प्रकरणात त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परिणामी, त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागेल. त्यानंतर ते ३० दिवसांच्या आत उच्च न्यायालयात या निर्णयाविरुद्ध अपील करू शकतात. त्यांचे वकील निकालाचे विश्लेषण करतील, सर्व घटकांची तपासणी करतील आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल करतील.

आझम खान यांना एकाच चुकीबद्दल दोनदा शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापूर्वी, १८ ऑक्टोबर २०२३ रोजी, रामपूर न्यायालयाने आझम खान, त्यांची पत्नी तंजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला यांना प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात अब्दुल्ला यांच्या बनावट जन्म प्रमाणपत्राचा समावेश होता.

अब्दुल्ला यांच्याकडे दोन जन्म प्रमाणपत्रे आहेत. एक रामपूरमध्ये जारी करण्यात आले होते. निवडणूक लढवताना त्यांनी लखनऊमधून दुसरे प्रमाणपत्र मिळवले. अब्दुल्ला यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रावर जन्मतारीख १ जानेवारी १९९३ आहे. तथापि, त्यांच्या जन्म प्रमाणपत्रात त्यांची जन्मतारीख ३० सप्टेंबर १९९० अशी नमूद आहे. या दोन जन्मतारीखांच्या आधारे दोन पॅन कार्ड जारी करण्यात आले.

शिक्षा झाल्यानंतर आझम आणि अब्दुल्ला यांनी त्यांच्या विधानसभेच्या जागा गमावल्या. आझम हे रामपूर शहराचे सपा आमदार होते, तर अब्दुल्ला स्वार मतदारसंघाचे सपा आमदार होते.

आझम खान यांच्या निवडणुकीनंतर, ५ डिसेंबर २०२२ रोजी रामपूर शहर जागेसाठी पोटनिवडणूक झाली. ७ डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाले, ज्यामध्ये भाजप उमेदवार आकाश सक्सेना यांनी आझम यांचे जवळचे सहकारी असीम रझा यांचा २५,७०३ मतांनी पराभव केला.

आकाश सक्सेना यांनी यापूर्वी २०२२ च्या रामपूर विधानसभा जागेवर आझम यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला. आकाश सध्या ४३ प्रकरणांमध्ये आझम यांच्या विरोधात थेट पक्ष आहे. आकाश सक्सेना हा व्यवसायाने व्यापारी आहे आणि माजी मंत्री शिव बहादूर सक्सेना यांचा मुलगा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande