बीड -गेवराई नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित - सुरेश धस
बीड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)बीड जिल्ह्यातील गेवराई नगर परिषदेचे निवडणूक भारतीय जनता पक्ष ताकदीनिशी लढणार असून निश्चित विजय प्राप्त होईल अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्हा निवडणूक प्रमुख आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.नगरपंचायत – नगरपरिषद निवडणु
अ


बीड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)बीड जिल्ह्यातील गेवराई नगर परिषदेचे निवडणूक भारतीय जनता पक्ष ताकदीनिशी लढणार असून निश्चित विजय प्राप्त होईल अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्हा निवडणूक प्रमुख आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.नगरपंचायत – नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेवराई येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले

माजी आमदार लक्ष्मण आण्णा पवार,बाळराजे दादा पवार, शिवराज पवार, माजी नगराध्यक्ष सुशील भाऊ जवंजाळ, माजी उपनगराध्यक्ष राजूभाऊ राक्षसभवनकर, राहुल जिजा खंडागळे, भगवान जिजा घुंबर्डे तसेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत सुरू असलेल्या निवडणुकांची रणनीती, जनसंपर्क मोहीम, संघटनात्मक बळकटी आणि स्थानिक मुद्द्यांवर प्रभावी नियोजन याबाबत संवाद झाला. कार्यकर्त्यांनीही आपले महत्त्वपूर्ण मुद्दे यावेळी मांडले.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande