
नांदेड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।
देगलूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीत कांग्रेस-शिवसेना उबाठा पक्षाची युती झाली आहे. देगलूर नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना एकत्रपणे लढणार आहेत या सदर्भात एका बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
देगलूर विधानसभा मतदारसंघात भारतीय घटना पक्षाचे वर्चस्व आहे
या पदार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेना पक्षामध्ये नगरपालिका निवडणुकीत युती झाली आहे
यावेळी काँग्रेस कडून श्रीनिवास पाटील,पक्ष निरीक्षक मुन्ना भाई अब्बास, मोगलाजी अण्णा सिरसेटवार, बालाजी सेठ रॉयलवार, रामदास पाटील सुमठाणकर,अविनाश नीलमवार,बिस्मिल्लाह चचा उपस्थिती होते.
शिवसेना कडून नांदेड जिल्हा प्रमुख भुजंग पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख दयाल गिरी, उपजिल्हाप्रमुख महेश पाटील,विजय पाटील मुंडकर, नागनाथ वाडेकर, बालाजी पाटील खुतमापूरकर, भगवान जाधव उपस्थित होते.
सर्वानी एकमताने, पूर्ण ताकतीने लढण्याचा निश्चय केले.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis