
अमरावती, 17 नोव्हेंबर (हिं.स.)कडकडत्या थंडीत तब्बल ५ किलोमीटरचे अंतर पार करून शेकडो स्पर्धकांनी कौंडण्यपूरच्या अंबा रुख्मिणी महोत्सव मध्ये एकच जल्लोष केला. महोत्सव विदर्भाचा, विदर्भाच्या पुरातन राजधानीचा नामक अंबा रुख्मिणी महोत्सव मध्ये भव्य विदर्भस्तरीय एकता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल हजारो रुपयांचे बक्षिसे ठेवण्यात आली होती. ज्यामध्ये तब्बल नऊ स्पर्धकांनी यामध्ये बाजी मारली. विशेष म्हणजे यावेळी छोटे स्पर्धक सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. थंडीच्या दिवसात युवकांचा उत्साह बघून तरुणाईला उजाळा मिळाला असे प्रतिपादन यावेळी उदघाटक रविराज देशमुख यांनी मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला केले.
सर्वप्रथम पहाटे ६. ०० वाजता सुरु झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेचे उदघाटन अंबा रुख्मिणी महोत्सव समितीचे अध्यक्ष व भाजपा जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी केले. यावेळी विशेष अतिथी म्हणून डॉ. उमेश राठी (पी. ई. एफ. आय. विदर्भ चाप्टर), डॉ. अतुल पाटील (सचिव, अमरावती अथेलेटिक असोसिएशन अमरावती), डॉ. कल्याण मालधुरे (अध्यक्ष, बॉडी बिल्डिंग वेट लिफ्टिंग संगाबा), रविंद्रजी हाडे (तिवसा खरेदी विक्री संचालक), प्रेमदास राठोड (सरपंच, गट ग्रामपंचायत कौंडण्यपूर) यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेला तब्बल नऊ पारितोषिक ठेवण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी