भारतीय विद्यार्थी अजितचा मृतदेह रशियाहून मायदेशी आणला; मूळ गावी केले अंत्यसंस्कार
जयपूर , 17 नोव्हेंबर (हिं.स.)। रशियामध्ये बेपत्ता झालेल्या राजस्थानच्या अलवर जिल्यातील 22 वर्षीय वैद्यकीय विद्यार्थी अजीत चौधरी यांचे पार्थिव सोमवारी सकाळी त्यांच्या मायगावात आणण्यात आल्यानंतर कफनवाडा गावात शोककळा पसरली. अजीतला अखेरचा निरोप देण्या
भारतीय विद्यार्थी अजितचा मृतदेह रशियाहून मायदेशी आणला; अलवरमध्ये करण्यात आले अंत्यसंस्कार


जयपूर , 17 नोव्हेंबर (हिं.स.)। रशियामध्ये बेपत्ता झालेल्या राजस्थानच्या अलवर जिल्यातील 22 वर्षीय वैद्यकीय विद्यार्थी अजीत चौधरी यांचे पार्थिव सोमवारी सकाळी त्यांच्या मायगावात आणण्यात आल्यानंतर कफनवाडा गावात शोककळा पसरली. अजीतला अखेरचा निरोप देण्यासाठी त्याचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ जमले होते.

अजीत चौधरी रशियातील उफा शहरातील बश्किर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. तो 19 ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. जवळपास दोन आठवड्यांनंतर, 6 नोव्हेंबर रोजी त्याचा मृतदेह व्हाईट रिव्हरजवळील एका धरणाजवळ आढळला. अजीतच्या मृत्यूची बातमी मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

कुटुंबीय भंवरसिंग यांनी सांगितले की रशियात एकदा पोस्टमार्टेम करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी भारतात पोहोचल्यानंतर अलवर जिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा पोस्टमार्टेम करण्यात आले. त्यानंतर पार्थिव गावात नेऊन अंतिम संस्कार करण्यात आले.

कुटुंबियांनी सांगितले की अजीत डॉक्टर बनून घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे स्वप्न पाहत होता. त्याच्या शिक्षणासाठी कुटुंबाला काही शेतीची जमीनही विकावी लागली होती. गावातील लोक त्याच्या अभ्यासातील निष्ठेची आणि शांत स्वभावाची प्रशंसा करताना दिसत होते.

भंवरसिंग म्हणाले, “त्याचा मृत्यू कसा झाला हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. अनेक गोष्टी समजण्यापलीकडे आहेत. त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक आहे.” अजीतच्या अकाली मृत्यूने संपूर्ण परिसर हादरला आहे. कुटुंबीय आता सरकारकडून या घटनेची विस्तृत चौकशी आणि न्यायाची मागणी करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande