
बीड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे माजलगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत.माझ्या उमेदवारांच्या पराभवासाठी धनंजय मुंडे बैठका घेत असल्याचा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला आहे. प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धनंजय मुंडे माझ्याविरोधात रणनीती आखत आहेत. माझ्या उमेदवारांच्या पराभवासाठी धनंजय मुंडे बैठका घेत असल्याचा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला आहे.
बीडमध्ये राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्याच पक्षातील सहकारी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडे माझा पराभव करण्यासाठी माझ्या विरोधकांसोबत बैठका घेत असल्याचा मोठा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला आहे.मुंडेंच्या फार्म हाऊसवर बैठका धनंजय मुंडे यांनी परळीतील नाथरा गावातील फार्म हाऊसवर प्लॅन आखल्याचा आरोप सोळंकेंनी केला आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis