
नांदेड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।
नांदेड उत्तर मतदारसंघातील मौजे सुगाव खुर्द येथे ग्रामपंचायतीच्या अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केला आहे नांदेडचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम प्रवेश सोहळा संपन्न झाला आहे. आमदार कल्याणकर यांनी या सर्वांचे स्वागत केले आहे
श्री. सुरेशराव भारसावडे सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच, श्री. संतोष शिंदे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि शेख जावेद उपसरपंच यांच्या नेतृत्वाखाली 100 ते 200 नागरिकांचा जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. गावातील आणि परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत केले. या प्रवेशामुळे पक्षाच्या संघटनाला नवचैतन्य मिळून विकासकामांना आणखी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नरसिंगराव भोसले होते. या प्रसंगी आ. बालाजी कल्याणकर सौ. संध्याताई कल्याणकर अध्यक्षा – शिवालय महिला उद्योग समूह, श्री. मंगेश कदम जिल्हाप्रमुख – , बाबुराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis