नितीश कुमार २० तारखेला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, पंतप्रधान राहणार उपस्थित
पाटणा, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या शानदार विजयाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (20 नोव्हेंबर 2025) रोजी नीतीश कुमार पाटणाच्या गांधी मैदानात दहाव्या वेळेस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. हा समारंभ भव्य शक्तिप्रदर्शन म्ह
नितीश कुमार २० तारखेला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ


पाटणा, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या शानदार विजयाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (20 नोव्हेंबर 2025) रोजी नीतीश कुमार पाटणाच्या गांधी मैदानात दहाव्या वेळेस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. हा समारंभ भव्य शक्तिप्रदर्शन म्हणून पाहिला जात आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, धर्मेंद्र प्रधान यांसारखे प्रमुख केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह एनडीएशासित इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

17 ते 20 नोव्हेंबरदरम्यान पाटणाचे गांधी मैदान सर्वसामान्य लोकांसाठी बंद ठेवण्यात आले असून तयारी अंतिम टप्प्यात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नीतीश कुमार यांच्या विद्यमान मंत्रिमंडळाची शेवटची बैठक होईल, त्यानंतर ते राजीनामा देऊन नवी सरकार स्थापनेसाठी दावा उपस्थित केला जाईल. एनडीएच्या सहयोगी पक्षांचे (जेडीयू, बीजेपी, एलजेपी(आर), एचएएम, आरएलएम ) आमदार आपले नेते निवडतील.

243 सदस्यीय विधानसभाेतील नुकत्याच झालेल्या दोन टप्प्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने 89 जागा तर जेडीयूने 85 जागा जिंकल्या आहेत. एनडीएने एकूण 202 जागांवर कब्जा करून मोठा विजय मिळवला आहे. खास बाब म्हणजे भाजप उत्कृष्ट स्ट्राइक रेटसह सर्वात मोठा पक्ष बनून उदयास आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एनडीएमध्ये मंत्रिमंडळ रचनेबाबत सहमती झाली आहे. नव्या मंत्रिमंडळात प्रत्येक 6 आमदारांमागे एक मंत्री असा फॉर्म्युला मान्य करण्यात आला आहे. या आधारे जेडीयूच्या वाट्याला 14 मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपकडून 15–16 मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो. लोजपा (रामविलास) च्या कोट्यातून 3 मंत्री, तर जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षांना प्रत्येकी एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

सत्ताधारी एनडीएला 202 जागा मिळाल्या असून 243 सदस्यीय सदनात हे तीन-चतुर्थांश बहुमत ठरते. ही दुसरी वेळ आहे जेव्हा एनडीएने विधानसभा निवडणुकांत 200 चा टप्पा ओलांडला आहे. 2010 च्या निवडणुकांत एनडीएने 206 जागा जिंकल्या होत्या. महागठबंधनाला केवळ 35 जागा मिळाल्या आहेत, ज्यामध्ये राष्ट्रीय जनता दलाने 25 आणि काँग्रेसने 6 जागांवर विजय मिळवला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande