अमारावती जिल्ह्यात पाणी सुरक्षेला गती, ६००हून अधिक ग्रामपंचायती ग्रीनझोनमध्ये
अमरावती, 17 नोव्हेंबर (हिं.स.) जिल्ह्यात पाण्यामार्फत पसरणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून राबविण्यात आलेल्या पाणी तपासणी मोहिमेत महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले आहेत. या मोहिमेत जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींना ग्रीनकार्ड तर २
अमारावती जिल्ह्यात पाणी सुरक्षेला गती  ६००हून अधिक ग्रामपंचायती ग्रीनझोनमध्ये


अमरावती, 17 नोव्हेंबर (हिं.स.)

जिल्ह्यात पाण्यामार्फत पसरणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून राबविण्यात आलेल्या पाणी तपासणी मोहिमेत महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले आहेत. या मोहिमेत जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींना ग्रीनकार्ड तर २३१ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले आहे. पिवळे कार्डधारक ग्रामपंचायतींना तातडीने सुधारित उपाययोजना करून ग्रीनकार्ड श्रेणीत आणण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे.मागील वर्षी काही गावांमध्ये जलजन्य आजारांचा उद्रेक झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयित कृती आराखडा तयार करण्यात आला. त्याअंतर्गत साथरोग नियंत्रणकक्षाची स्थापना करून व्यापक सर्वेक्षण हाती घेण्यात आले.या सर्वेक्षणात जलस्त्रोतांच्या परिसराची स्वच्छता, शौचालय व गोठे यांचे अंतर, जलवाहिन्यांमधील लिकेज, टाक्यांची स्थिती, क्लोरिनचे प्रमाण, तसेच स्रोतातील पाण्याची गुणवत्ता यासह सर्व बाबी तपासण्यात आल्या. विशेष म्हणजे, यापूर्वी जिल्ह्यात रेडकार्ड असलेल्या ग्रामपंचायतीही होत्या; मात्र या वर्षी एकही ग्रामपंचायत रेडकार्ड श्रेणीत राहिलेली नाही, ही सकारात्मक बाब आहे.पिवळे कार्डधारक ग्रामपंचायतींना योग्य ती पावले उचलण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या असून, त्यांना लवकरात लवकर ग्रीनकार्ड मिळावे यासाठी उच्चस्तरीय समितीमार्फत सातत्याने देखरेख ठेवण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande