
बीड, 17 नोव्हेंबर (हिं.स.) जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षात योगेश क्षीरसागर यांनी प्रवेश केल्यामुळे नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढली आहे दुसरीकडे राष्ट्रवादीसह इतर पक्षात गोंधळाचे वातावरण दिसती आहे अद्याप कोणत्याही उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही.
राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे डॉ. योगेश व डॉ. सारिका क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. दुसरीकडे राष्ट्रवादीने शिवसेना व शिवसंग्रामसोबत युती निश्चित केली आहे. या सगळ्या गोंधळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आ. संदीप क्षीरसागर यांच्याकडे मात्र दोन दिवसांत अनेकांनी प्रवेश केला आहे. आता एमआयएमच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.
जिल्हा मुख्यालय ठिकाणची आणि सर्वात मोठी नगरपालिका असलेल्या बीड नगर परिषदेवर वर्चस्व असणे सर्वच प्रमुख पक्षांसाठी महत्वाचे असते. मागील तीन दशकांपासून क्षीरसागर घरण्याभोवतीच पालिकेचे राजकारण फिरत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने शिवसेना, शिवसंग्रामशी युती केली. १६ जागांची मागणी केलेल्या शिवसेनेला ५ ते ६ जागा दिल्या आहेत. शिवसंग्रामलाही सन्मानजनक जागा दिल्या जाणार आहेत. रिपाइंला नगराध्यक्षपद दिले जाईल, तर भाजप आता बीड पालिका स्वबळावर लढणार आहे. त्याचे सर्वाधिकार योगेश यांच्याकडे असतील,
आ. संदीप क्षीरसागर यांनी वेट अँड वॉच अशी भूमिका घेतली. त्यांनी अद्यापही उमेदवार जाहीर केले नाहीत. योगेश क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशामुळे किंवा राष्ट्रवादी-शिवसेना युतीमुळे अडचण झालेले इच्छुक आता आ. संदीप क्षीरसागर यांच्याकडे येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
डॉ. योगेश यांच्या प्रवेशाने बीडमध्ये भाजपला चेहरा मिळाला. गतवेळी १ नगरसेवक असलेला भाजप आता मोठा स्पर्धेक म्हणून समोर आला आहे. मुस्लिम मतांची भाजपमुळे योगेश यांना काहीशी अडचण होईल. दोन्ही राष्ट्रवादी व एमआयएम यांच्यातील विभाजनावर योगेश यांचा डोळा असेल
राष्ट्रवादी सोडून भाजपत प्रवेश करणे हा योगेश क्षीरसागर यांच्या आयुष्यातील मोठा निर्णय आहे. यासाठी पत्नी डॉ. सारिका यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis