मोबदल्यासाठी त्र्यंबकरोडवरील शेतकऱ्यांकडून ७० याचिका
नाशिक, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। - सिंहस्थानिमित्ताने रुंदीकरण करण्यात येत आहे .नाशिक-त्र्यंबकेश्वररोडवरील बाधित ७० शेतकरी, व्यावसायिकांनी आता थेट उच्च न्यायालयातच धाव घेतली आहे. न्यायालयानेही याबाबत एनएमआरडीएला नोटिसा बजावल्या आहेत. परंतु शासकीय पत्र
मोबदल्यासाठी त्र्यंबकरोडवरील शेतकऱ्यांकडून ७० याचिका


नाशिक, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। - सिंहस्थानिमित्ताने रुंदीकरण करण्यात येत आहे .नाशिक-त्र्यंबकेश्वररोडवरील बाधित ७० शेतकरी, व्यावसायिकांनी आता थेट उच्च न्यायालयातच धाव घेतली आहे. न्यायालयानेही याबाबत एनएमआरडीएला नोटिसा बजावल्या आहेत. परंतु शासकीय पत्रा-पत्रीच्या कारभारात विलंब होण्याची शक्यता गृहित धरून हे शेतकरीच आता या नोटिसा कशा एनएमआरडीएला पोहोचतील अन् ते न्यायालयात पुढील तारखेला हजर होतील याची काळजी घेत आहे. त्याची जमवाजमवही करत आहेत.

नाशिक-त्र्यंबक रस्ता मनपाच्या हद्दीबाहेर महानगर विकास प्राधिकरणाच्या (एनएमआरडीए)हद्दीत आहे. वाढीव रस्त्यासाठी घेतलेल्या बांधकामाचा व जागांचा मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांसह व्यावसायिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. सोबतच थेट उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande