
अकोला, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने अकोला जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ सरचिटणीस ॲड.आकाश हिवराळे यांच्या नेतृत्वाखाली परिक्षा नियंत्रक डॉ.नितीन कोळी सर यांना विधी क्षेत्रात शिक्षण घेत असणाऱ्या अनेक अधिवक्ता यांच्याकरिता महत्वपूर्ण असणारी ऑल इंडिया बार एक्सामीनेशन (एआयबीई)ही महत्वपूर्ण मानली जाणारी परीक्षा 30 नोव्हेंबर रोजी असून या दरम्यान येणारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ची हिवाळी 2025 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती सदर मागणीची दखल घेत 29 नोव्हेंबर 2025 चा एल.एल.एम.सेमिस्टर -1 चा पेपर पुढे ढकलुन 11 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे. व 1,2 व 3 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षा सुद्धा पुढे घेण्यात येणार त्या 20,22 व 23 डिसेंबर ला घेण्यात येणार असून यामुळे विद्यार्थ्यांना (एआयबीई) व इतर परीक्षेसाठी दिलासा मिळाला असून विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा झाले असून या मुळे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी नेते ॲड.आकाश हिवराळे यांचे आभार मानले असून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ चे रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने निर्णयाचे स्वागत केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे