
अकोला, 18 नोव्हेंबर (हिं.स.) : अकोला जिल्ह्यात आगामी नगर पंचायत आणि नगरपालिका निवडणुक अनुषंगाने नागरिकांना सुरक्षित आणि शांततामय वातावरण मिळावे त्याकरीता पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांचे निर्देशानुसार जिल्हयात आकस्मीक नाकाबंदी चे आयोजन करण्यात आले होते.
सदर नाकाबंदी दरम्यान पोलिस विभागाच्या वतीने आकस्मीक नाकाबंदीचे आयोजन करून तसेच विशेष पथके तयार करून सार्वजनीक ठिकाणी दारू पिउन गोंधळ घालणे, शांतता भंग करणाऱ्या व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ९३ इसमांवर मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत कार्यवाही करण्यात आली. तसेच संपुर्ण जिल्हयात नाकाबंदी राबवुन, नाकाबंदी दरम्यान जिल्हयातील एकुण ४० नाकाबंदी पॉईंट वर १२४८ वाहने चेक करून मोटार वाहन कायदयान्चये २४० कारवाई करून १,४२,५००/-रू चा दंड आकरण्यात आला आहे. दारू बंदी अधिनीयम अंतर्गत ०४ केसेस व कोटपा कायद्यान्वये ०२ केसेस करण्यात आल्या आहेत. नाकाबंदी दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी नाकाबंदीच्या ठिकाणी भेटी दिल्या तसेच सर्व ठाणे प्रभारी अधिकारी यांनी नाकाबंदी मध्ये सक्रीय सहभाग घेवुन प्रभावी नाकबंदी करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभुमी वर जिल्हयात शांतता राहावी याकरिता बेकायदेशीर कृत्यांपासून नागरीकांनी दूर राहावे, आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. अकोला पोलिसांकडून अशा प्रकारचे विविध प्रतिबंधक उपयोजना अधिक तीव्रतेने राबवुन, कायदा मोडणाऱ्यांवर कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही. करीता सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करावे आणि शहराच्या शांततेत योगदान द्यावे व नागरिकांच्या सहकाऱ्यानेच जिल्हयात शांतता व सुव्यवस्था राखली जाऊ शकते, असे आवाहन पोलीस अधीक्षक, अकोला यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे