अंबाजोगाईतील नवीन जिल्हा कारागृह उभारणीच्या प्रक्रियेला वेग
बीड, 18 नोव्हेंबर, (हिं.स.)। बीड जिल्ह्यात नवे, अत्याधुनिक जिल्हा कारागृह अंबाजोगाई येथे उभारण्यासाठीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. अंबाजोगाई लगतच्या मौजे काळवटी, लमाण तांडा येथील सर्वे नं. १/अ/५ मधील ३० एकर शासकीय गायरान जमीन कारागृह विभागास
अंबाजोगाईतील नवीन जिल्हा कारागृह उभारणीच्या प्रक्रियेला वेग


बीड, 18 नोव्हेंबर, (हिं.स.)। बीड जिल्ह्यात नवे, अत्याधुनिक जिल्हा कारागृह अंबाजोगाई येथे उभारण्यासाठीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. अंबाजोगाई लगतच्या मौजे काळवटी, लमाण तांडा येथील सर्वे नं. १/अ/५ मधील ३० एकर शासकीय गायरान जमीन कारागृह विभागास प्रदान करण्यास राज्य शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. शासनाचा हा आदेश जाहीर झाल्याने अंबाजोगाईतील कारागृह प्रकल्पाच्या कामाला आता प्रत्यक्ष गती मिळणार आहे. गृह विभागास जमीन प्रदान करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यावर निर्णय घेत शासनाने जमीन प्रदान करण्यास मंजुरी दिली..

अंबाजोगाईतील जुने उपजिल्हा कारागृह इमारत नादुरुस्त झाल्यामुळे फार वर्षांपूर्वी बंद करण्यात आले होते. त्यानंतर शहरात आधुनिक, सुरक्षित व सक्षम कारागृहाची गरज तीव्र बनली होती. तत्कालीन पालकमंत्री स्व. विमल मुंदडा यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाचा प्रारंभिक प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर झाला होता. पुढील प्रक्रियेला गती देण्यासाठी जागा निवड, मोजणी व नकाशे तयार करण्याची कामे पूर्ण झाली होती. या संपूर्ण उपक्रमाला निर्णायक वळण मिळवून देण्यात आ. नमिता मुंदडा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जिल्हा कारागृहावर वाढता ताण, अंबाजोगाई व आसपासच्या तालुक्यातील आरोपींची दररोज होणारी बीड जिल्हा कारागृहापर्यंतची धावपळ, सुरक्षाविषयक कारणे आणि न्यायिक प्रक्रियेतील विलंब या सगळ्या प्रश्नांकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. वारंवार पाठपुरावा करून शासन पातळीवर हा विषय प्राधान्यक्रमात आणला.

गतवर्षी काळवटी तांडा परिसरातील जागेची मोजणी पूर्ण होऊन नकाशा तयार झाल्यानंतर प्रशासकीय मान्यतेसाठी कारागृह प्रशासनाला जमिनीचा ताबा देणे आवश्यक होते. यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी घेतलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरला. त्यानुसार यापूर्वी राज्य शासनाने जमिनीचा आगाऊ ताबा कारागृह विभागास देण्याचे आदेश दिले आणि आता शासनाने जमीन अधिकृतरीत्या प्रदान करण्याची मंजुरीही जाहीर केली आहे. जिल्हा स्तरावर लवकरच हस्तांतरणाची औपचारिक कार्यवाही पूर्ण होणार असून अंबाजोगाईत अत्याधुनिक कारागृह उभारणीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे सध्याच्या बीड येथील जिल्हा कारागृहावरील ताण कमी होणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande