बीड येथील खंडोबा मंदिरात २५, २६ नोव्हेंबरला यात्रोत्सवाचे आयोजन
बीड, 18 नोव्हेंबर (हिं.स.)बीड जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री खंडोबा दीपमाळ मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त २५ ते २६ नोव्हेंबर २०२५ या दोन दिवसीय भव्य यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री खंडोबा दीपमाळ मंदिरातील दीपमाळेवर विद्युत रोषणाई करण्या
बीड येथील खंडोबा मंदिरात २५, २६ नोव्हेंबरला यात्रोत्सवाचे आयोजन


बीड, 18 नोव्हेंबर (हिं.स.)बीड जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री खंडोबा दीपमाळ मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त २५ ते २६ नोव्हेंबर २०२५ या दोन दिवसीय भव्य यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री खंडोबा दीपमाळ मंदिरातील दीपमाळेवर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता भक्तांच्या उपस्थितीत अभिषेक, पुजा, पंचपक्वानाचा महाप्रसाद तर २६ नोव्हेंबर रोजी बाजरीची भाकर आणि वांग्याच्या भरताचा महाप्रसाद असणार असून, त्याचा २५ हजार भाविक लाभघेणार असल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले. चंपाषष्ठी हा दिवस मल्ल-मणी राक्षसांचा संहार करून धर्मरक्षण केल्याच्या ऐतिहासिक पौराणिक स्मृतीशी जोडलेला आहे. त्यामुळे या दिवशी अभिषेक, दीपदान, काठीपूजन, पालखी सोहळा, जागरण-गोंधळ आणि रथ प्रदक्षिणा अशा पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व असते.

या यात्रेनिमित्त मंदिर संस्थानतर्फे विशेष महापूजा व अभिषेक, भजन-कीर्तन व जागरण गोंधळ, भव्य पालखी व रथ प्रदक्षिणा, महाप्रसाद, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, स्वच्छता उपक्रम आदींचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्राउत्सवासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून श्री खंडोबाच्या दिव्य पालख्या येणार आहेत. या दिव्य उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घ्यावे, असे आवाहन श्री खंडोबा संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande