भोसला मिलिटरी स्कूलमध्ये बिबट्या नव्हे, रानमांजर; वनविभागाची माहिती
नाशिक, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। भोसला मिलिटरी स्कूल या ठिकाणी बिबट्या नसून रानमांजर असल्याचा खुलासा वनविभागाच्या वतीने करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे. नाशिक शहरामध्ये कॉलेज रोड परिसरात असलेल्या भो
भोसला शाळे परिसरातील तो बिबट्या नसून रान मांजर, वनविभागाची माहिती


नाशिक, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। भोसला मिलिटरी स्कूल या ठिकाणी बिबट्या नसून रानमांजर असल्याचा खुलासा वनविभागाच्या वतीने करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे.

नाशिक शहरामध्ये कॉलेज रोड परिसरात असलेल्या भोसला मिलिटरी स्कूल परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्या जेर बंद करण्यात आलेला होता त्यानंतर या ठिकाणी पुन्हा बिबट्या दिसल्याची माहिती सोमवारी दुपारी मिळाल्यानंतर या ठिकाणी वन विभागाचे पथक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचलेले होते त्या ठिकाणी बिबट्याचा शोध घेतला जात होता त्यानंतर या शोध मोहिमेमध्ये थर्मल ड्रोन चा वापर देखील करण्यात आला आणि त्या माध्यमातून बिबट्याच्या शोध घेण्याचे प्रयत्न केले गेले. बिबट्या मात्र दिसून आला नाही त्यामुळे रात्रभर या परिसरामध्ये ही शोध मोहीम सुरू होती.

या शोधू मोहिमेबाबत मंगळवारी सकाळी वनविभागाच्या वतीने माहिती देताना सांगण्यात आले की, दिनांक 17 नोव्हेंबर रोजी भोसला मिलिटरी स्कूलच्या कॅम्पसमध्ये लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेराची आज मंगळवारी सकाळी तपासणी केली असता त्यामध्ये रान मांजरांचा फोटो मिळाला आहे. या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा बिबट्या किंवा हिंसक प्राणी दिसून आला नाही. माहिती मिळाल्यानंतर वनविभागासह या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दरम्यान या परिसरामध्ये बिबट्या असल्याच्या कारणावरून बिबट्या असल्याच्या कारणावरून शाळेला सुट्टी देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande