बीड जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक उमेदवार
बीड, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।बीड जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी राजकारणाने टोक गाठले. विविध पक्षातील अभूतपूर्व फुटी मुळे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांचा सस्पेन्स कायम राहिल्यामुळे सर्वच नगर परिषदेमध्ये ना
बीड


बीड, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।बीड जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी राजकारणाने टोक गाठले. विविध पक्षातील अभूतपूर्व फुटी मुळे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांचा सस्पेन्स कायम राहिल्यामुळे सर्वच नगर परिषदेमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. सर्वांचे लक्ष भेटलेल्या परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे एकत्र आले आहेत.

मुंडे यांची युती झाली असून अंबाजोगाई आणि गेवराई दुरंगी तर बीडमध्ये चौरंगी लढत होणार आहे.

परळी नगर परिषदेत भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे पक्षाने युती केली आहे या जागा वाटपात धनंजय मुंडे यांच्या गटाला 21 जागा मंत्री पंकजा मुंडे यांच्या भाजपला 11 जागा आणि शिवसेना शिंदे सेनेला तीन जागांवर स्थानदेण्यात आले आहे

बीड नगरपरिषद निवडणूक-२०२५ साठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉ.ज्योती रविंद्र घोमरे यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकरज देशमुख, आदित्यजी सारडा, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथअण्णा शिराळे, शहराध्यक्ष अशोक शेठ लोढा, सलीम जहांगीर, ज्येष्ठ नगरसेवक गणेश वाघमारे, डॉ.सारिका क्षीरसागर, इर्शादभाई शेख यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद निवडणुकीत भाजपने ५२ उमेदवारांना रिंगणात उतरवले असून नगराध्यक्ष पदासह सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याचा ठाम निर्धार सर्वांनी व्यक्त केला. विकासाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकत भाजपा बीड नगरपरिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande