नगरपरिषद निवडणूक तयारी : जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भोकरदनला भेट
जालना, 18 नोव्हेंबर (हिं.स.)नगर परिषद व नगर पंचायत निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी भोकरदन येथे भेट दिली व पाहणी केली.यावेळी उप जिल्हाधिकारी सामान्य प्रशासन श्रीमती नम्रता चाटे, उप विभागीय अधिकारी भोकरदन बी.सर्वन,निवडणूक निर्णय अधिकारी
निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यावर विशेष भर


जालना, 18 नोव्हेंबर (हिं.स.)नगर परिषद व नगर पंचायत निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी भोकरदन येथे भेट दिली व पाहणी केली.यावेळी उप जिल्हाधिकारी सामान्य प्रशासन श्रीमती नम्रता चाटे, उप विभागीय अधिकारी भोकरदन बी.सर्वन,निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती करिष्मा चौधरी, तहसीलदार भोकरदन ज्ञानेश्वर काकडे यांची उपस्थिती होती.

यावेळी भोकरदन नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला.निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी उभारण्यात आलेले विविध कक्षांची पाहणी केली व नोडल अधिकारी यांना निवडणूक विषयक कामकाज चोखपणे पार पाडण्याबाबत निर्देश दिले.

जिल्हाधिकारी मित्तल यांनी निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यावर विशेष भर दिला. उमेदवार तसेच पक्ष कार्यकर्त्यांनी नियमांचे पालन करावे आणि प्रशासनाने कोणत्याही तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.या भेटीदरम्यान मतमोजणी कक्षाची व सुरक्षा कक्षाची पाहणी केली व मतदान केंद्रांची मूलभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, कर्मचारी नियोजन, साहित्य उपलब्धता, संवेदनशील व अतिसंवेदनशील केंद्रांची स्थिती आदींचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. तसेच निवडणूक कालावधीत आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी हे निर्देश त्यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande