
लातूर, 18 नोव्हेंबर, (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील पन्नगेश्र्वर शुगर मिल्स लिमिटेडचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न झाला.
पन्नगेश्र्वर शुगर मिल्स लिमिटेड, विमल नगर, पानगाव, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सन 2025-26 चा पहिला बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मंगळवार रोजी चेअरमन श्री. अक्षय मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे संपन्न झाला.
या प्रसंगी श्री. राजूशेठ भन्साळी, श्री. शरद इंगळे, श्री. रोहन मुंदडा, श्री. रवी भन्साळी, श्री. सोळुंके श्री. वाकडे (जनरल मॅनेजर), चीफ इंजिनीअर , श्री. मोरे श्री. काटे ऍग्री ऑफिसर श्री. करपे, चीफ केमिस्ट श्री. हेडे , चीफ अकाउंटंट श्री. खोसे, ऊस पुरवठा अधिकारी, कार्यालय अधीक्षक, सिव्हिल इंजिनीअर, एचआर विभाग, सिक्युरिटी ऑफिसर तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis