भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी मंत्री मुंडेंची घेतली परळीत भेट
बीड, 18 नोव्हेंबर (हिं.स.)बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी दाखल केलेल्या सर्व उमेदवारांनी परळी येथील यश:श्री निवासस्थानी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची परळी येथे भेट घेतली.बीड जिल्ह्यातील नगरपरिषद न
अ


बीड, 18 नोव्हेंबर (हिं.स.)बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी दाखल केलेल्या सर्व उमेदवारांनी परळी येथील यश:श्री निवासस्थानी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची परळी येथे भेट घेतली.बीड जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाचे आपले उमेदवार जाहीर केले आहेत त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी चे सर्व उमेदवार यांनी थेट परळी गाठली आणि पंकजा मुंडे यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली आहे.

पक्षाने दाखवलेल्या विश्वासासाठी सर्वांनी याप्रसंगी आभार व्यक्त केले.अंबाजोगाईचे नंदकिशोर काका मुंदडा, गेवराईच्या गीता भाभी पवार, धारूरचे रामचंद्र निर्मळ, बिडच्या डॉ.ज्योती घुमरे, माजलगावच्या डॉ.संध्या मेंडके, जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख आणि इतर पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande