
नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर (हिं.स.)।दिल्लीतील रामनाथ गोयनका लेक्चरला मंगळवारी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलामीची मानसिकता याचा उल्लेख करून काँग्रेसवर जोरदार टीका केली. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काँग्रेसचे खासदार शशि थरूर यांनी मात्र सोशल मीडिया एक्सवर पोस्ट लिहत पंतप्रधानांच्या भाषणाची मोठी प्रशंसा केली आहे. यामुळे राजकीय तापमान चिघळण्याचे संकेत मिळत आहेत.
खासदार थरूर यांनी एक्सवर लिहिले की, “पंतप्रधानांनी यावर भर दिला की भारत आता केवळ उदयोन्मुख बाजारपेठ नाही, तर जगासाठी एक उभरते मॉडेल आहे.” थरूर यांनी पुढे लिहिले,स“पंतप्रधान मोदींवर नेहमी निवडणूक मोडमध्ये असल्याचा आरोप होतो, पण प्रत्यक्षात ते लोकांच्या समस्यांच्या समाधानासाठी भावनिकपणे कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. भाषणातील एक महत्त्वाचा भाग मॅकॉलेने पेरलेल्या 200 वर्षं जुन्या गुलाम मानसिकतेच्या वारशाला उलथून टाकण्यावर केंद्रित होता.”
थरूर म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी भारताची समृद्ध परंपरा, देशातील भाषा आणि शिक्षण व्यवस्थेचा गौरव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी 10 वर्षांच्या राष्ट्रीय मोहिमेचे आवाहन केले. काश त्यांनी हेही मान्य केले असते की रामनाथ गोयनका यांनी भारतीय राष्ट्रवादाची आवाज होण्यासाठी इंग्रजी भाषेचाही प्रभावी वापर केला होता. एकूणच पंतप्रधानांचे भाषण आर्थिक दृष्टिकोन आणि सांस्कृतिक आवाहन या दोन्हींचे मिश्रण होते, ज्यात राष्ट्राला प्रगतीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन होते. सर्दी-खोकल्याचा त्रास असूनही उपस्थित राहणे आनंददायी होते.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode